खेड : शहराजवळील भरणे येथील हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत संशयित मंगेश शांताराम शिंदे (वय ५४, रा. भरणे) हा कल्याण मटका घेत असताना पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडून १,३०० रुपये रोख रक्कम, ५० रुपये किमतीचे कल्याण असे लिहिलेले एक पावतीबुक व ५ रुपये किमतीचा एक निळ्या शाईचा पेन असा एकूण १३५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १८ सप्टेंबरला सायंकाळी करण्यात आली. येथील पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिपाई अश्विनी संभाजी यादव यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 20/Sep/2025














