चिपळूण : चिपळूण परिसरात मगरींचा वावर वाढला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी रात्री शहरातील उक्ताड भागात रॉयल पॅलेस इमारतीच्या पार्किंगमध्ये मगर आढळली. येथील स्थानिक नागरिकांनी ती पाहिल्यानंतर वनविभागाला माहिती दिली.
वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी सर्वर खान यांनी उक्ताडमध्ये वनविभागाचे पथक पाठवले. वनकर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून ही मगर जेरबंद केली. ही मगर ८ फूट लांबीची असून, तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 20/Sep/2025









