Gogate Jogalekar College : गोगटे जोगळेकर राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘स्वच्छ भारत उपक्रम’

रत्नागिरी : शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन परिसराची स्वछता केली. तसेच स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केले.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाविद्यालयीन तसेच स्थानिक परिसरातील स्वच्छता केली जाते. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. महाविद्यालयातील खातू नाट्य मंदिर परिसर, जवाहर क्रीडांगण येथील स्वच्छता करण्यात आली. १०९ स्वयंसेवकानी या अभियानात सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 20/Sep/2025