गुहागर : वेलदूर जावळेवाडी येथील घरावर वीज कोसळली

गुहागर : मेघगर्जनेसह रविवारी (दि. २०) सायंकाळच्या वेळेत अचानक पाऊस सुरू असताना गुहागर तालुक्यातील वेलदूर जावळेवाडी येथील एका घरावर वीज कोसळून घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेत बबन देवजी जावळे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे. समुद्र किनारपट्टीलगत वादळी वाऱ्याचा जोर जास्त आहे. काही दिवसांपूर्वी वेलदूर नवानगर येथील श्रीराम मंदिराच्या कळसावर वीज कोसळल्याची घटना घडली होती. या पाठोपाठ रविवारी जावळेवाडी येथील बबन देवजी जावळे यांच्या घरावर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळून घरातील इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णतः जळाले आहे. या दुर्घटनेत घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेमुळे भिंतीला तडे गेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 22/Oct/2024