रत्नागिरी : महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगाना मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षण देते. २०२५-२६ या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे.
गरजू दिव्यांगानी त्वरित संपर्क साधा, असे आवाहन शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह मिरजच्या अधीक्षकांनी केले आहे. प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, मिरज, ता. मिरज, जि. सांगली येथे संपर्क साधावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 20/Sep/2025












