Ratnagiri : देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली भाट्ये किनाऱ्याची सफाई

रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर महाविद्यालयामधील (डीजीके) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी भाट्ये समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली. या वेळी वन विभागातील कर्मचारी, जलजिविका संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या २५ स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला.

संपूर्ण भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. या अभियानास जलजिविका संस्थेचे चिन्मय दामले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. मिथिला वाडेकर उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 20/Sep/2025