खेड : शहराजवळील भडगांव-खोंडे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियाना अंतर्गत १७ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा घेण्यात आली.
या सभेस येथील तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार सुषभा धातरे, पशुधन विस्तार अधिकारी डोईफोडे., एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी दीपाली शिरीषकर, तसेच एकात्मिक बालविकास सुपरवाईजर काटकर कृषी विभागाच्या दिवाळे, जि.प.प्रा. शाळा भडगाव उसरेवाडीच्या मुख्याध्यापिका श्रद्धा खेडेकर.. भडगाव खॉडे ग्रामपंचायत सरपंच दीपक पद्मले व इतर मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबवणे, स्वच्छता ही सेवा २०२५ चा राज्यस्तरीय शुभारंभ, ग्रामपंचायत हद्दीत गावचे पाणंद शिवार गाडीमार्ग / पायमार्ग इ.चर्चा., पंधरवडा साजरा करणे ४ सेवा पंधरवडा., अँग्रीस्टैंक रजिस्ट्रेशन., शाळा शाळास्तरावरील वर्गांचे होणारे मूल्यमापन., विद्यार्थी प्रगती अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. कोरम पूर्ण करत सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यात आली. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदीशक्ती ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व तालुक्याच्या माजी सभापती अपर्णा नक्षे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
शासनाची मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत योजना सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनी यशस्वी करून हातभार लावावा, असे आवाहन गावच्या पंचायतराज अभियानाच्या सचिव श्रद्धा खेडेकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:52 PM 20/Sep/2025














