Guhagar : गुहागर ग्रामीण रुग्णालयात २५ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिर

श्रृंगारतळी : शासनाच्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ अंतर्गत गुहागर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

या शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, नाक, कान, घसा तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार उपचार तज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, अस्थिरोग तज्ज्ञ, दंतचिकित्सक, आयुष तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. तसेच गरोदर स्त्रियांची मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये रुग्णांना आयुष्यमान कार्ड, वयोवंदना कार्ड काढून देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 20/Sep/2025