खेड : सन 2025-26 या वर्षासाठी आयोजित खेड तालुकास्तरीय विज्ञान नाट्यस्पर्धेत श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल, खेड यांनी सादर केलेल्या ‘रामू झाला स्मार्ट शेतकरी’ या नाटिकेला प्रथम क्रमांक मिळाला. या नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावत्ता येते हे प्रभावीपणे मांडले.
या नाटिकेमध्ये कु. शाल्मली तांबडे, प्रणव बेलोसे, गार्गी मोरे, कार्तिकी भांबड, वेदांत माळी, रोहित आंबुर्ले, सृष्टी सावरटकर आणि अंतरा सुसविरकर यांनी उत्कृष्ट अभिनय सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. याशिवाय श्रीमती अश्विनी शिंदे, परम शिंदे, वेदांत पदुमले आणि स्वराज शिंदे यांनी टेक्नोसेवी म्हणून कार्य करत नाटिकेच्या यशात मोलाचे योगदान दिले.
या नाटिकेचे लेखन आणि दिग्दर्शन सौ. अनघा तोडकरी यांनी केले असून सहदिग्दर्शनाची जबाबदारी सौ. हेमा आंबुर्ले आणि सौ. मुग्धा बेलोसे यांनी पार पाडली. तसेच श्री. वनारे यांचेही बहुमोल सहकार्य लाभले.
या स्पर्धेत कु. शाल्मली तांबडे हिला उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान मिळाला. या यशस्वी उपक्रमासाठी सन्माननीय संस्था पदाधिकारी, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. म्हस्के, पर्यवेक्षक श्री. कांबळे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिलेले सहकार्य लक्षणीय ठरले. या विजयानंतर चंदुलाल शेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात येत असून सर्वांनी या नाटिकेचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 20/Sep/2025










