Ratnagiri : गोळप सडा येथे नवरात्रोत्सव; २२ पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : शहरानजीक साळवी नगर, गोळप सडा येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ, दि. २२ सप्टेंबरपासून भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करणार आहे. १२ दिवसांचा हा उत्सव ३ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, यामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

प्रमुख कार्यक्रम
देवीचे आगमन आणि प्रतिष्ठापनाः
सोमवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता देवीचे आगमन होईल. सकाळी १० वाजता ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाईल आणि सकाळी ११:३० वाजता मंडळाच्या अध्यक्षा सौ. नेहा आनंद साळवी यांच्या हस्ते देवीची प्रतिष्ठापना, पूजा आणि आरती होईल.

दांडिया रासः २२ ते २६ सप्टेंबर, २८, २९, ३० सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० पासून दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे.

भजनांचा जंगी सामनाः शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजता बुवा श्री. संदीप लोके आणि बुवा श्री. गुंडू सावंत यांच्यात २०४२० भजनांचा जंगी सामना रंगेल.

गोंधळः शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता गोंधळ जोगवा मागण्याचा कार्यक्रम आणि रात्री १० वाजता गोंधळाची कथा होईल.

पाककला आणि रांगोळी स्पर्धाः सोमवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता पाककला आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील सहभागासाठी केतन झगडे (मो. ९४२१७०७५८९) यांच्याशी संपर्क साधावा.

डान्स स्पर्धाः मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता ५ ते २० वयोगटातील मुलांसाठी डान्स स्पर्धा होईल.

हवन आणि महाप्रसादः बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होम-हवन आणि कुमारी पूजन होईल. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शक्ति-तुऱ्यांचा जंगी सामनाः बुधवार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता शक्ती तुऱ्यांचा जंगी सामना होईल. यामध्ये रायगडचे शाहीर योगेश जाधव आणि शाहीर तेजस पवार यांच्यात चुरशीचा मुकाबला पाहायला मिळेल.

दसरा आणि सोने वाटपः गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता दसऱ्यानिमित्त मंदिरात सोने वाटपाचा कार्यक्रम आहे.
विसर्जन मिरवणूकः

शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक काढली जाईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन दुगदिवी नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षा सौ. नेहा आनंद साळवी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 20/Sep/2025