चिपळूण : कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची पहिली सर्वसाधारण सभा शहरातील डी. बी. जे. महाविद्यालय येथे झाली. या सभेसाठी जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी आणि तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी प्रा. गिरीराज पांडे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व तालुका प्रतिनिधींना निवड पत्र देण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष प्रा. विनायक बांद्रे यांनी केले. उपाध्यक्ष प्रा. विठ्ठल केंद्र, सहसचिव प्रा. वसंत भुसारे, सहखजिनदार प्रा. क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष प्रा. भाग्यदेवी चौगले यांनी अध्यक्षीय भाषणात महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले व महासंघाचे सचिव प्रा. बाळासाहेब माने यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठी विषय शिक्षकांना एकत्रित करून एकाच व्यासपीठावर आणण्याल्याबद्दल आभार मानले.
यावेळी तालुका प्रतिनिधी प्रा. अजित भोसले, प्रा. मनीषा पाटील, प्रा. वैभव पाध्ये, प्रा. वजय गावडे, प्रा. श्रेया भावे, प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. पाचकळे, प्रा. तृप्ती यादव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पराग बोराटे यांनी केले. प्रा. पोरे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 22/Oct/2024










