khed Ramvardayini devi : श्री रामवरदायिनी देवी मंदिरात आजपासून नवरात्रौत्सव

खेड : तालुक्यातील चोरवणे गावात भक्तांच्या नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आदिमाया आदिशक्ती श्री रामवरदायिनी देवीचे मंदिर आहे. या देवीचा नवरात्रौत्सवास २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे.

या नवरात्रौत्सवानिमित्त महाअभिषेक, विधिवत पूजा, महामंगल आरती, हरिपाठ, भजन, गरबा व जागर मंदिरात आयोजित करण्यात येणार आहे. २७ रोजी दुपारी २ वाजता महिला भजन मंडळ तिसंगी हभप स्नेहल नंदकिशोर भोसले यांचे भजन व रात्री १० वा. वरदान मानाई भोलेनाथ पिरदनकर कला मंच प्रस्तूत जय हनुमान भजनी भारुडी मंडळ दहिवली खुर्द कुंभारवाडी यांचा भारुड कार्यक्रम होणार आहे. ३० रोजी दुर्गाष्टमी होमहवन, हरिपाठ, भजन, दांडिया होणार आहे.

ग्रामविकास मंडळ चोरवणे मुंबई, पुणे आणि श्री रामवरदायिनी देवस्थान कमिटी, तसेच ग्रामस्थांच्या माध्यमातून उत्सव साजरा होत आहे. मंदिरात मागील ३ वर्षांपासून दररोज दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत महाप्रसादाची सोय असते. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व सुवासिनींची ओटी भरली जाते. भाविकांसाठी महाप्रसाद तथा उपवास असणाऱ्या भाविकांसाठी फराळाची सोय करण्यात आलेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 22/Sep/2025