चिपळूण : जातात. सावर्डे व परिसरात चिपळुणातील विद्यार्थी शिक्षणासाठी महाविद्यालय सुटल्यानंतर चिपळूणला परत येण्यासाठी वेळेत बसफेरी नाही. वहाळ येथे बुधवारी गुळवणे बस थांबवण्यात आली नाही. वाहकाने विद्यार्थ्यांशी अरेरावी केल्याची तक्रार युवासेना तालुका अधिकारी (उबाठा) उमेश खताते यांच्याकडे केली. यानंतर युवासेना पदाधिकाऱ्यांनी चिपळूण आगारात धडक देत निवेदन दिले.
यावेळी शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, युवासेना तालुका सचिव प्रतीक शिंदे, उपशहर प्रमुख आकाश कदम, ओंकार गायकवाड, विभागप्रमुख अर्थव चव्हाण, साहील शिर्के, शाखाप्रमुख राहुल गुरव उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आगारप्रमुखांना निवेदन देत विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोयींची माहिती दिली व सायंकाळी ५ वा. वहाळमार्गे ज्यादा बसफेरी सोडावी, अशी मागणी करीत संबंधित
वाहकाला जाब विचारला.
यानंतर आमदार भास्कर जाधव यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेत सारा प्रकार सांगितला. जाधव यांनी तातडीने आगारप्रमुख चव्हाण यांना दूरध्वनी करत विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याबाबत सूचना केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 22/Sep/2025














