मंडणगड : शाळा सुटल्यानंतर घरी बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मुख्य संशयितांसह अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जुलैला जिल्ह्यातील एका शाळेतील संशयित शिक्षकाने शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला शाळेत असलेला चार्जर घेऊन घरी बोलावून घेतले. सोबत आलेल्या दुसऱ्या मुलीला दुकानात साहित्य आणण्यासाठी पाठवले. यानंतर पीडितेला हॉलमध्ये बोलावून गैरवर्तन केले. यामुळे घाबरलेल्या मुलीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला.
अखेर तब्बल दीड महिन्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेने तक्रार देऊ नये म्हणून दबाव टाकल्याप्रकरणी प्रकाश शिगवण, सुभाष शिगवण, वैभव भानसे, पांडुरंग शिगवण, रघुनाथ भानसे, शंकर होडबे, मनोहर जोशी, संदीप कांबळे, राकेश साळुंखे या नऊ जणांविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 22/Sep/2025














