चिपळूण : ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रस्त्यांची नोंद आता भूमी अभिलेख विभागाकडे होणार आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी शिवारफेरी काढून रस्त्याची माहिती संकलित करून नकाशे करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर खेड येथील उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी भोस्ते मोहल्ला येथील शेत रस्त्याची पाहणी करत यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या.
ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते पायवाटांची नोंद ग्रामपंचायतीच्या अभिलेखात होते; मात्र वापरात असलेल्या अनेक रस्त्यांच्या नोंदी नाहीत. असे सर्व शेतरस्ते, शिवरस्ते पाणंद रस्ते, पायवाटा याबाबतच्या नोंदी आता घेतल्या जात आहेत. सेवा पंधरवडाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील या कामांना सुरुवात झाली आहे. गावोगावी शिवारफेरी काढून ग्रामसभा घेऊन रस्त्यांची निश्चिती केली जात आहे.
प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी तालुक्यातील भोस्ते येथे सुरू असलेल्या रस्ता मोजणीच्या कामास भेट दिली. जस्नाईक मोहल्ला येथील शेतरस्त्याची मोजणी महसूल विभागाचे ग्राममहसूल अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे भूमापक व स्थानिक पोलिस पाटील यांच्याकडून करण्यात आली. मोजणीची काने शासन निर्देशाप्रमाणे होतात की, नाहीत याचा आढावा घेण्यात आला. प्रांताधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या मोजणीबाबत आवश्यक त्या सूचना यंत्रणेला केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 22/Sep/2025














