Chiplun : पाग येथील श्री सुकाई देवी मंदिरात आजपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ

चिपळूण : शहरातील पाग येथील श्री सुकाई देवी मंदिरात दि. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. नवरात्रौत्सवाची सुरुवात सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. घटस्थापनेने होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ६ वा. हिंदू जनजागृती समितीचे प्रवचन नवरात्रौत्सव आणि शौर्य जागरण, रात्री १० वा. श्री देव हनुमान प्रासादिक भजन मंडळ पाग-चिपळूण यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.

दि. २३ रोजी रात्री १० वा. श्रीदेव गोपाळकृष्ण भजन मंडळ पाग, दि. २४ रोजी सायंकाळी ४ वा. नवगणेश महिला मंडळ पिंपळी खुर्द यांचे भजन, दि. २५ रोजी रात्री १० वा. श्री सुकाई देवी भजन मंडळ भुवड बंधू व सहकारी, सायंकाळी ४ वा. विश्वकर्मा महिला भजन मंडळाचे भजन होईल. रात्री १० वा. हनुमान प्रासादिक भजन मंडळ ओझरवाडी, तसेच दि. ३० सप्टेंबरपर्यंत विविध मंडळांची भजने सादर होणार आहेत. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. श्री घटीदेव उत्थापन होईल. दि. २ रोजी विजयादशमीनिमित्त सोने लुटणे हा पारंपरिक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वा. मराठी व हिंदी गीतांचा कार्यक्रम, रात्री ९ वा. महिलांचा फुगडी व टिपरी नृत्य कार्यक्रम होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 22/Sep/2025