पावस : पावसाच्या सातत्यामुळे पहिल्या टप्प्यातील भातशेती पसवण्यास सुरुवात झाली आहे; मात्र गेले चार दिवस पडणाऱ्या पावसाने रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी परिसरातील कातळावरील भातशेती आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मेर्वी परिसरात कातळावर मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेती चांगली होते. त्यामुळे या भागातील सर्वजण कातळावर शेती करतात. या परिसरात पावसाने कातळावरील भातशेती आडवी पिकाच्या नुकसानीची शक्यता; कापणीस तयार भातशेती लवकर तयार होते; मात्र गेले चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे येथील तयार भातशेती आडवी झाली आहे.
त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास आडवे पडलेले भात पुन्हा रूजून येण्याची शक्यता आहे. या संदर्भात शेतकरी विनायक खर्डे म्हणाले, यावर्षी शेती चांगल्या प्रकारे तयार झाली होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर भात तयार होण्यास सुरुवात झाली होती; परंतु अचानकपणे गेले चार दिवस पडणाऱ्या पावसाने शेती आडवी झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 PM 22/Sep/2025














