Shardiya Navaratri 2025 : पावस परिसरामध्ये २० देवींची प्रतिष्ठापना

पावस : नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा यादृष्टीने पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावस परिसरामध्ये घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मूर्तिकारांची लगबग सुरू असून अखेरचा हात फिरवत असून प्राणप्रतिष्ठेसाठी देवीच्या मूर्ती सज्ज आहेत. पावस परिसरामध्ये २० देवींची प्रतिष्ठापना होणार आहे.

पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व उत्सव शांततेत साजरा करावा. यासाठी परिसरातील नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक सहायक पोलिस निरीक्षक विक्रम सिंग पाटील यांनी घेतली. बैठकीत प्रत्येक नागरिकांनी जबाबदारी ओळखून व सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.

पावस पंचक्रोशीतील वेगवेगळ्या गावांमध्ये वीस देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सात ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे देवींच्या मंदिरांवर आकर्षक रोषणाई केली असून उत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 22/Sep/2025