Ratnagiri : बांबूपासून शोभिवंत वस्तू बनविण्याचे १ ते १४ ऑक्टोबर दरम्यान मोफत प्रशिक्षण

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानतर्फे १ ते १४ ऑक्टोबर या १४ दिवसांच्या कालावधीत बांबूपासून विविध शोभिवंत वस्तू बनविण्याचे मोफत प्रशिक्षण आयोजित केले आहे.

हे प्रशिक्षण हे सलग असून, सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असणार आहे. प्रशिक्षणामध्ये पेन स्टँड, मोबाईल स्टँड, लॅम्प सेट, कंदील, लेटर बॉक्स, फुलदाणी, ट्रे, ऑलपीस, अगरबती स्टँड, आदी वस्तू प्रात्यक्षिकासह शिकविल्या जाणार आहेत. याचबरोबर शिक्षकांचे मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास व उद्योजकता विकास याविषयी मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात चहा, नाश्ता, जेवण, निवास व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रशिक्षणासाठी अर्ज करणारा उमेदवार रत्नागिरी जिल्ह्याचा रहिवासी असावा. उमेदवार उमेद बचतगटातील सदस्य किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती किंवा एसईसीसी किंवा मनरेगा यापैकी एका पात्रतेत पात्र असणारी व्यक्ती प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. अर्ज भरण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, बँक पासबुक या सर्व कागदपत्रांची प्रत्येकी एक झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो द्यावा. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वक्रतुंड अपार्टमेंटजवळ, निसर्ग वसाहत, शांतीनगर, नाचणे रोड, रत्नागिरी येथे अर्ज आणून द्यावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 22/Sep/2025