दापोली : देहेणमध्ये आज कृषी प्रदर्शन

दापोली : तालुक्यातील देहेण कानसेवाडी येथे कोकण कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत २२ ऑक्टोबरला दुपारी २.३० वाजता कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विशेष अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनील दळवी, केंद्रप्रमुख रावे डॉ. जगदीश कदम, रावेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद मयेकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांमध्ये शेतकरी वर्गाला येणाऱ्या अनेक शंकांचे निरसन केले जाणार आहे. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील तसेच देहेण व सुकोंडी ग्रामपंचायत येथील शेतकरी बंधू, भगिनींनी उपस्थित राहावे, असे आहन आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 22-10-2024