रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, शिवाजी हायस्कूल, जलजीविका संस्था, सागरी सीमा मंच, स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट या संस्थांनी संयुक्तपणे मिऱ्या किनाऱ्यावर किनारपट्टीची स्वच्छता केली. आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त या मोहिमेचे आयोजन केले होते. सर्व संस्थांनी या किनाऱ्याची वर्षभर स्वच्छता राहण्याकरिता कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरवले आहे.
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे महत्व सांगितले. स्वच्छतेची शपथ दिली. समुद्रकिनारा स्वच्छतेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. या समुद्रकिनाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू आढळून आल्या. गोळा केलेल्या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी सागरी सीमा मंचाचे स्वप्निल सावंत, संजीव लिमये, रंजन आगाशे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. आसीफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरीश धम्मगये, नरेंद्र चौगुले, वर्षा सदावर्ते, अर्चना सावंत, जाई साळवी, रमेश सावर्डेकर, किल्लेकर, कुबल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्रा. नीलेश मिरजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे, मयुरी डोंगरे, मानसी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे ३० विद्यार्थी सहभागी झाले. शिवाजी हायस्कूलच्या ५७ विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जलजीविका संस्थेचे चिन्मय दामले, सहकारी यांनी उपस्थित विद्याथ्यर्थ्यांना हॅण्डग्लोव्हज आणि पिण्याचे पाणी पुरविले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 22/Sep/2025














