Khed : रस्ता वेळीच दुरुस्त करा… अन्यथा ३ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा

खेड : तालुक्यातील भडगावच्या खोंडे भागातील ज्ञानदीप विद्यामंदिरमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी शाळेजवळील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी पालकांच्या वतीने खेड नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये रस्ते दुरुस्ती न केल्यास ३ ऑक्टोबर रोजी पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी पालक प्रतिनिधी मंदार आपटे, रोहन विचारे, नंदकिशोर भालेकर, अभिजित पाटणकर, श्रीधर गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पालकांनी बांधकाम विभागास लेखी पत्र देऊन ३० सप्टेंबरपर्यंत शाळेच्या मागील व पुढील रस्त्याची सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ३ ऑक्टोबर रोजी सर्व पालकांसह नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.

शाळेच्या परिसरातील खराब
रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोयीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता पालकवगनि थेट आंदोलनाची भूमिका घेतल्याने नगरपालिकेपुढे प्रश्न सोडविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 22/Sep/2025