देवरुख : संगमेश्वरातील कासे, कळंबुशी, वडेरु या गावांतून नायशी कळंबुशी हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांसाठी बुधवारपासून माखजन, कासे, कळंबुशी ते वडेरु मार्गे नायशी हायस्कूलपर्यंत बस सुरू करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
सकाळी ९.१५ वाजता माखजन बस स्थानकातून ही बस सुटून कळंबुशी ते वडेरु या मार्गावरील सर्व गावांतून जाणार आहे. या बसचे स्वागत बुधवारी विद्यार्थीवर्ग, पालक, शिक्षक व प्रवाशांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 22/Sep/2025














