अधिकाऱ्यांनी कामात कसूर केल्यास कारवाई : राज्यमंत्री योगेश कदम

रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळायला हवा. अधिकाऱ्यांनी कामात अजिबात कसूर करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.

दापोली तालुक्यातील देगाव येथे आज विविध शासकीय योजना अंमलबजावणी आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार अर्चना बोंबे, पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, ममता शिंदे, प्रकाश कालेकर, अनंत करबेले, प्रभाकर गोलांबडे, विश्वास खांबे आदी उपस्थित होते.

महावितरण, टेलिफोन, सार्वजनिक बांधकाम, पोस्ट ऑफिस, कृषी विभाग, महसूल विभाग आदी विभागाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी विविध प्रश्न विचारले. या वेळी शासकीय विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 22/Sep/2025