रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर करू नका जेणेकरून कुणाची मानहानी अथवा धार्मिक थेढ निर्माण होणार नाही. पण तरीदेखील काही अतिउत्साही लोकांकडून अशा पोस्ट होतात. अशाच एका पोस्ट संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टकर्त्याने आमदार उदय सामंत यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट सोशल मिडीयावर केली होती. पोलीस स्थानकात आता या पोस्ट कर्त्यावीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा दाखल होताच हि व्यक्ती आपला मोबाईल बंद करून बसली आहे. त्याचा गावखडी गावात देखील शोध घेतला असता तो मिळून आला नाही. आता त्याचा मुंबई येथे शोध सुरु असून पुढील कारवाई चालू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 22-10-2024