दापोली-दाभोळ रस्त्यावर भलामोठा खड्डा

दापोली : दापोली-दाभोळ या मुख्य रहदारीच्या मार्गावर पेट्रोल पंपनजीक रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या खड्ड्यामुळे वाहनांची ये-जा धोकादायक ठरत आहे. नागरिक व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पडलेल्या खड्यात अपघात होता होता बचावले आहेत.

तर खड्डा वाढत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. याआधीही सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे खड्डा पडला होता, त्यावेळी फक्त मलमपट्टी करून काम भागवण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनी यावेळी ठोस व कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 22/Sep/2025