Ratnagiri : झाडगाव येथील श्री देवी जोगेश्वरी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील श्री देव जोगेश्वरी मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ रोजी सकाळी १० वा मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता कीर्तन होणार आहे. २३ रोजी सायं. ६ वा श्री देव भैरव प्रासादिक मंडळ मुरूगवाडा याचे भजन आयोजित करण्यात आले आहे. २४ रोजी स्वानंद भजन मंडळाचे भजन, २५ रोजी दुपारी सिद्धीविनायक भजन मंडळाचे भजन, २६ रोजी दुपारी ४ वाजता जय भवानी भजन मंडळ, २७रोजी दुपारी ४ वाजता श्री सुक्त पठण तर २८ रोजी दुपारी ४ वा. भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता कीर्तन व ५ वाजता सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत.

दरम्यान जोगेश्वर मंदिरात दररोजचे रात्री ८ वा. मुख्य आरती व १० वाजता भोवत्या असा कार्यक्रम असणार आहे. आयोजकांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, त्यांनी उत्सवात सहभागी होऊन देवीच्या कृपेचा लाभघ्यावा. धार्मिक भक्तीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतही यंदा विशेष असणार असल्याचे आयोजकांकडून कळवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 22/Sep/2025