गुहागर : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या आणि गुहागर तालुक्यातील देवघर येथे झालेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत खो-खो या क्रीडा प्रकारामध्ये तालुक्यातील कोळवली येथील माध्यमिक विद्यालय पंचक्रोशी कोळवली या विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
कोळवली हायस्कूलच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये पालपेणे हायस्कूलच्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. याबद्दल ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे, उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, सचिव नारायण मोहिते, खजिनदार वासुदेव डिंगणकर, शंकर जोशी यांच्यासह मुख्याध्यापक विजय पिसाळ यांनी विजयी खेळाडू आणि मार्गदर्शक यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 22/Sep/2025














