रत्नागिरी : शहरातील पऱ्याची आळी येथील अल्फास्टार बारच्या बाजूला बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१० वा. सुमारास करण्यात आली.
मनोज प्रभाकर कांबळे (३५, रा. अशोकनगर परटवणे, रत्नागिरी) आणि प्रभाकर भिकू नाचणकर (४७, रा. तेलीआळी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल आशिष भालेकर यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित हे पऱ्याची आळी येथील अल्फास्टार बारच्या बाजूला असलेल्या बंद दुकानाच्या आडोशाला लोकांकडून पैसे स्वीकारुन मटका जुगार खेळ चालवत होते. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३६ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 22/Sep/2025














