Ratnagiri : जिल्ह्यातील २ हजार बालकांना देणार गोवर रुबेला लस

रत्नागिरी : आश्रम शाळांतील ५ ते १५ वयोगटातील बालकांसाठी गोवर रूबेला लस मोहीम राबवण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समन्वयात सुमारे २००० बालकांना गोवर-रूबेला लस दिली जाणार आहे.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आश्रम शाळा व मदरसामध्ये गोवर रूबेला आजार निर्मूलन करण्यासाठी विशेष लसीकरण मोहिमेबाबत नियोजनपर आढावा बैठक घेण्यात आल्या. या लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागाचे पथक सक्रिय असणार असून प्रत्येक पथकात प्रशिक्षित आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा व मदरसे मधील बालकांचे गोवर-रूबेला लसीकरण प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील संस्थेतील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेऊन शाळेतील १०० टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण करावे. पालकांनी देखील बालकांना गोवर-रूबेला लसीकरणासाठी वंचित राहू नये, याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 22/Sep/2025