गुहागर : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक शृंगारतळी येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
जनसंघापासून काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे २००९ पूर्वीचे गतवैभव पुन्हा एकदा मिळविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या छत्राखाली काम करताना तहान-भूक विसरून काम करणारा कार्यकर्ता म्हणून आमची ओळख आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आम्हाला अवगत आहे. त्यामुळे १४ वर्षांनी गुहागर विधानसभा मतदारसंघावर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून भाजपाचा झेंडा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघात जनसंघापासून काम करणारे भाजपचे जुनेजाणते कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 22/Oct/2024










