Khadpoli MIDC : खडपोली मार्गावर होणार ३० टनांपर्यंत वाहतूक

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथील जुना पूल गाणे-खडपोली खचल्यानंतर एमआयडीसीतील अवजड वाहतूक पूर्णतः बंद पडल्यानंतर पर्यायी शिरगांव-पेढांबे, खडपोली मार्गावर २० टनांपर्यंतची वाहने सोडण्यात येत होती. मात्र, शुक्रवारी सर्व विभागाचे अधिकारी, खडपोली सरपंच, ग्रामस्थ आणि कारखानदार यांनी संयुक्तपणे रस्त्यातील अडथळ्यांची पाहणी केल्यानंतर या मार्गावर ३० टनांपर्यंतच्या वाहतुकीस प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी परवानगी दिली आहे.

सध्या या मार्गावर रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत २० टनी वाहने शिरगांव-पेढांबेमार्गे गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत येत असून जाताना ती वालोटीमार्गे सोडली जात आहेत. अवजड वाहतूक सुरू करतानाही काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र आ. शेखर निकम तसेच प्रांताधिकारी लिगाडे यांनी या सर्वांची समजूत करतानाच शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे सांगितले होते. शुक्रवारी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शिवसेनेचे सचिन कदम, दशरथ दाभोळकर, मुराद अडरेकर आदींनी मार्गाची पाहणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 22/Sep/2025