Maharajswa Abhiyan : नेवरे व कोतवडे येथे ३० सप्टेंबर रोजी जिवंत मिळकत पत्रिका व फेरफार अदालत

रत्नागिरी : महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा अंतर्गत दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नगर भूमापन कार्यालयामार्फत रत्नागिरी तालुक्यातील नेवरे व कोतवडे येथे ३० सप्टेंबर रोजी जिवंत मिळकत पत्रिका व फेरफार अदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन कार्यालयाने केले आहे.

मिळकत पत्रिकेवरील मयत धारकांच्या वारस नोंदीबाबतची संपूर्ण प्रक्रिया उपक्रमात पार पाडली जाणार आहे. मिळकत पत्रिकेवरील धारकाची नावे अद्यावत केली जाणार आहेत. हा उपक्रम नेवरे व कोतवडे येथे घेण्यात येणार असून, नागरिकांना कार्यालयात न येता घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 22/Sep/2025