Mukhyamantri Samruddha Panchayatraj Abhiyan : शंभर टक्के घरपट्टी वसुलीचा गणेशगुळेत निर्धार

पावस : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील पहिल्या टप्प्यात घरपट्टी १०० टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने निश्चित केले आहे. त्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सरपंच प्रसाद सुनील तोडणकर यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गणेशगुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेवेळी ते बोलत होते. यावेळी १३७ ग्रामस्था उपस्थित होते. गेल्या अडीच वर्षात प्रथमच ग्रामसभेला समाधानकारक उपस्थिती होती. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रसाद सुनील तोडणकर, ग्रामसेवक श्रीमती रजनी काचवे, मंगला तोडणकर, सुषमा शिंदे, अश्विनी साळुंखे, अश्विनी शिंदे, रवी तेरवणकर, तलाठी शिल्पा मयेकर, पोलीस पाटील संतोष लाड, तंटामुक्त अध्यक्ष विक्रम गुरव उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामसभेला मार्गदर्शन केले. त्यांनी समृध्द पंचायतराज अभियान राबविण्याचे महत्त्व विषद केले. या अभियानांतर्गत पुढील शंभर दिवस ग्रामपंचायतीनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकसहभागातून पंचायतराज व्यवस्था सक्षम करावी असे आवाहन केले. याप्रंसगी सरपंच प्रसाद तोडणकर यांनी ग्रामस्थांना आवाहन केले कि ३० सप्टेबरपर्यंत पहिल्या टप्यात घरपट्टी १०० टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठेवले आहे. गावकऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून गणेश गुळे राज्यात आदर्श ठरवेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ग्रामस्थांच्या समस्या लवकरात लवकर सोडवून एक आदर्श गाव करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:46 PM 22/Sep/2025