Ratnagiri : घटस्थापनेने नवरात्रौत्सवाला प्रारंभ

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारपासून ‘आई उदे गं अंबे उदे’ च्या जयघोषात आदिशक्तीचा उत्सव असणार्‍या शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 501 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने शहरासह जिल्ह्यातील देवीच्या मंदिरांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच, मंदिरात उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, मंदिरे विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहेत.

सार्वजनिक आणि खासगी मिळून एकूण 19739 प्रतिमा आणि घटपूजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करत सोमवारी 501 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने अनेक ठिकाणी गरब्याचेही आयोजन करण्यात येते. या नऊ दिवसांत जिल्ह्यात दांडिया व गरब्याची ‘धूम’ अनुभवायला मिळणार असून, यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरांपुरताच घटस्थापना करण्यापर्यंत हा उत्सव मर्यादित होता.

मात्र, यामध्ये आता कमालीचा बदल झाला असून, त्यानुसार, जिल्ह्यातील पोलिस ठाणे निहाय आकडेवारीनुसार, दाभोळ पोलिस ठाणे हद्दीत दुर्गामातेच्या सार्वजनिक 2 खासगी 4, मंडणगड सार्वजनिक 43 खासगी 3, खेड सार्वजनिक 27 खासगी 0, दापोली सार्वजनिक 33 खासगी 17, बाणकोट सार्वजनिक 12 खासगी 4, जयगड सार्वजनिक 18 खासगी 4, पूर्णगड सार्वजनिक 20 खासगी 0, संगमेश्वर सार्वजनिक 17 खासगी 6, रत्नागिरी शहर सार्वजनिक 60 खासगी 1, रत्नागिरी ग्रामीण सार्वजनिक 90 खासगी 13, राजापूर सार्वजनिक 12 खासगी 0, देवरुख सार्वजनिक 24 खासगी 5, नाटे सार्वजनिक 9 खासगी 2, लांजा सार्वजनिक 14 खासगी 2, अलोरे सार्वजनिक 12 खासगी 0, सावर्डे सार्वजनिक 3 खासगी 1, चिपळूण सार्वजनिक 14 खासगी 1, गुहागर सार्वजनिक 26 खासगी 2 अशा एकूण 436 सार्वजनिक तर 65 खाासगी मिळून जिल्ह्यात 501 दुर्गामातेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 23-09-2025