रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात २४ रोजी ‘अॅकॅडमिक क्रेडिट बँक’ कार्यशाळा

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २४ रोजी ‘अॅकॅडमिक क्रेडीट बँक’ यावर आधारित एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन कण्यात आले आहे. ही कार्यशाळा रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी असणार आहे. कार्यशाळेत महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यशाळेकरिता महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेलीचे राज्य समन्वयक अभिषेक देब हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी डॉ. विवेक भिडे आणि प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 22/Oct/2024