Ratnagiri Rain : रत्नागिरीला 25,26 सप्टेंबर रोजी ‘यलो अलर्ट’; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी एकूण 140.17 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरी 15.57 मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस खेड तालुक्यात झाला असून 44.85 मि. मी. इतका झाला आहे. दरम्यान, मंगळवार,बुधवार वगळता गुरूवार दि. 25 आणि शुक्रवार दि. 26 सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नवरात्रीत दमदार पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. त्या नंतर आता सप्टेंबर महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. काही तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. दिवसा उन आणि रात्री पावसाची सरी कोसळत आहेत. सोमवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, मंगळवार, बुधवार वगळता शुक्रवार दि. 26 सप्टेंबर पर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट ’ जाहीर करण्यात आला आहे. ऐन नवरात्रीत पाऊस पडत असला तरी भक्तामध्ये उत्साह दिसून येत आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट
गुरूवार दि. 25 सप्टेंबर रोजी रत्नागिरी, रायगड, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तर शुक्रवार दि. 26 सप्टेंबर रोजी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, नागपूर,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आदी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 23-09-2025