रत्नागिरी : खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विशाखा विश्वास नागवेकर (वय ६२, रा. आंबेशेत, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे.
ही घटना रविवारी (ता. २१) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. विशाखा नागवेकर यांना हृदयाचा आजार होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यावर उपचारही झाले होते. घरी असताना त्यांना अचानक खोकला आला व श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला व उलटी झाली. नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 23/Sep/2025














