Ratnagiri : शामराव पेजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गावखडी किनारा, पूर्णगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

पावस : स्वच्छता हीच खरी सेवा या उपक्रमांतर्गत लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावखडी सागरीकिनारा व पूर्णगड किल्ल्यावर साफसफाई केली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्वच्छता हीच खरी सेवा, या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम उपक्रमात सहभाग घेऊन लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी मोहिमेत सहभाग दर्शवला. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. कल्पना मेस्त्री यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

यासाठी गावखडीचे सरपंच गौतम पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता करण्यात आली. प्र. प्राचार्य प्रमोद वारीक यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. प्रा. अमित पवार व शिक्षकेतर कर्मचारी गोवर्धन मोहिते यांनीही यासाठी सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 23/Sep/2025