Yogesh Kadam | मंडणगडमध्ये उद्योग निर्मितीतून रोजगारासाठी प्रयत्न : मंत्री योगेश कदम

मंडणगड : योग्य ध्येय, मेहनत व जिद्दीच्या जोरावर आपल्या क्षेत्रात यश संपादित करून जीवनात यशस्वी होता येते. त्यासाठी नियोजनाचीही अत्यंत आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसंदर्भात या बावींचे पालन करणे आवश्यक आहे, विकासाच्या संकल्पना वेगवेगळ्या असल्या तरी आर्थिक विकास महत्वाचा असल्याने मंडणगड एमआयडीसीच्या तालुक्यात माध्यमातून उद्योग निर्मितीतून येथील युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केले.

मंडणगड मैत्री फाउंडेशनच्या वतीने शनिवारी शहरातील बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजेश मर्चडे होते.

यावेळी गटविकास अधिकारी सुनील खरात, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, नगरसेवक आदेश मर्चेंडे, मैत्री फॉडेशनचे अध्यक्ष मनोज मचँडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, शिवसेना शहरप्रमुख विनोद जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, प्रा. याचवाड, संभाजी ब्रिगेडचे सूर्यकांत जाधव, चेतन सातोपे, अनिल रटाटे, उद्योजक शंकर जंगम, कुणाल मंडलिक, इरफान बुरोंडकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात दहावी, बारावी उत्तीर्ण व विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या गुणवंतांचा गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दहावी, बारावी व पदवीनंतरच्या करिअरच्या विविध क्षेत्रातील संधींबाबत कुणाल मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज मर्चडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन सुप्रिया मर्चडे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 23/Sep/2025