रत्नागिरी : ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३७ मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज अखेर ३७ शिबिरांमधून १ हजार ६९६ जणांनी या शिबिराचा लाभघेतला. १२८ रुग्णांची शस्त्रक्रिया झाली. ८४३ जणांना चष्मा देण्यात येणार आहे, अशी माहिती मोहीम प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली.
गावपातळीवरील, दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा लाभ मिळत आहे. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया करून दिले जात आहेत. नेत्ररोग उपचाराचा खर्च गोरगरीब नागरिकांना परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना उपचाराची संधी या उपक्रमातून उपलब्ध होत आहे.
डॉ. सुनील डोखळे यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यासाठी डॉ. वनिता कानगुले संपूर्ण जिल्ह्यातील नियोजन करत आहेत. डॉ. विकास कुमरे, डॉ. अंकुश शिरसाट हे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथील तर डॉ. महेंद्र गावडे हे जिल्हा परिषदेच्या आरोग्यकेंद्रांचे नियोजन करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 23/Sep/2025














