रत्नागिरी : जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांचेतर्फे अपील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालत २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, रुम नं. २०१ रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख एस. एस. इंगळी यांनी केले आहे.
लोक अदालतमध्ये जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांचेकडील प्रलंबित अपील प्रकरणावर सुसंवादाच्या माध्यमातून न्याय व जलद निर्णय देण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी अपिलामधील दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड करण्यास मदत करुन सदर अपील प्रकरणे कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी संबंधित नागरिकांनी सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे सोबत घेऊन उपस्थित राहावे. जेणेकरुन प्रकरणाचा योग्य व अंतिम निपटारा करता येईल. लोक अदालतीद्वारे तातडीने व पारदर्शक पध्दतीने प्रकरण सोडविण्याचा हेतू असून त्यामुळे वेळेची व संसाधनाची बचत होणार आहे. याबाबतची माहिती collectormumbaisuburban.gov.in या वेबसाईटवर विभाग भूमी अभिलेखच्या पेजवर प्रसिध्द केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 23/Sep/2025














