Chiplun : खेर्डी येथे चोरून आणलेल्या स्कूटरसह एकाला अटक

चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावर खेर्डी येथे चोरून आणलेल्या स्कूटरसह एकाला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सुनील पांडुरंग पाटील (वय २८, सध्या रा. पिंपळी, मूळ रा. तळगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला अटक केली आहे.

ही घटना दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रूपेश जोशी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कराड मार्गावरील खेर्डी येथे सुनील पाटील हा काळ्या रंगाची सुझुकी अॅक्सेस गाडी घेऊन संशयितरित्या फिरताना आढळून आला. त्याला गाडीच्या मालकी हक्काबाबत विचारले असता उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ती चोरून आणल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून ४० हजार रूपये किंमतीची सुझुकी अॅक्सेस गाडी जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 23/Sep/2025