Guhagar : वेळणेश्वर अभियांत्रिकीत २५ पासून ‘नवोदय २०२५’ तांत्रिक महोत्सव

गुहागर : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात २५ व २६ सप्टेंबर रोजी ‘नवोदय २०२५’ राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागांतर्फे केले असून, संपूर्ण राज्यातून विविध अभियांत्रिकी व विज्ञान शाखांतील विद्यार्थी या महोत्सवात सहभाग घेणार आहेत.

या तांत्रिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ज्ञान, कौशल्य व सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या अनेक स्पर्धा ठवल्या आहेत. संगणक अभियांत्रिकी विभागात विविध ई-स्पोर्टस् स्पर्धा आयोजित केल्या आहेत, यासाठी बक्षिसे ठेवली असून सहभागी विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 23/Sep/2025