राजापूर : ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे असून त्याला धक्का लागू देणार नाही. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार रविवारी झालेल्या तालुका ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीमध्ये करण्यात आला.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील सभागृहामध्ये ओबीसी जनमोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला तालुका सरचिटणीस चंद्रकांत जानस्कर, दीपक नागले, अनिल भोवड, अॅड. शशिकांत सुतार, प्रकाश मांडवकर, रवींद्र नागरेकर, अभिजीत गुरव, विद्याधर राणे, प्रकाश कुवळेकर, आबा आडिवरेकर, अनामिका जाधव, संतोष हातणकर, मनोहर गुरव, दीपक बेंद्रे, रविकांत भामत, डी. एम. चव्हाण, प्रकाश झोरे, विनोद शेलार, विलास हर्याण, जितेंद्र पाटकर, श्रीकांत राघव, भास्कर कुवळेकर, महेश मणचेकर, नरेश दुधवडकर, अरविंद लांजेकर, उमेश पराडकर, प्रकाश लोळगे, सुभाष नवाळे, शुभांगी सोलगावकर, शितल पटेल आदी उपस्थित होते.
ओबीसी जनमोर्चाचे तालुकाध्यक्ष श्री. शिवलकर यांनी ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी त्यामध्ये सर्व ओबीसी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. मारूती खेडस्कर यांनी ग्रामीण भागातील या लढ्याला मुंबईस्थित चाकरमान्यांनी सक्रिय सहभागाचे बळ देण्याची अपेक्षा व्यक्त केली. अॅड. सुतार यांनी ओबीसी आरक्षणातील कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या. अभिजीत गुरव यांनी केवळ सभा, बैठका न घेता ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलन करीत थेट रस्त्यावर उतरूया, असे मत मांडले. अनिल भोवड यांनी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनामध्ये सर्व ओबीसी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सुरेश बाईत, मधुकर तोरस्कर, शुभांगी सोलगावकर, मनोहर गुरव, संतोष हातणकर, संतोष तांबे, प्रकाश झोरे, बलवंत सुतार, डी. एम. चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 23/Sep/2025














