लांजा : शासनाच्या विविध आरोग्यविषयक सेवा सुविधांचा लाभ घेवून आपले आरोग्यमान चांगले राखा, असे आवाहन आरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शमिका शैलेश खामकर यांनी आरगाव येथे केले.
तालुक्यातील आरगाव येथे नुकतेच स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. शमिका शैलेश खामकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र रिंगणे अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर आरगांव येथे आयोजित या कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सदरील शिबीरामध्ये रक्तदाब , मधुमेह , नेत्र तपासणी, दंत तपासणी, गरोदर मातांची तपासणी तसेच लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग , स्तन व मुख कर्करोग तपासणी, मासिक पाळी बद्दल मार्गदर्शन, वैयक्तिक स्वच्छता व पोषण बद्दल समुपदेशन, माता व बालक संरक्षण कार्ड वाटप , प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी, आयुष्यमान कार्ड काढणे, अवयवदान नोंदणी तसेच आरोग्य शिक्षण देऊन अनेक प्रकारच्या आरोग्य विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शैलेश खामकर , डॉ. काष्टे , प्रा.आ.केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री. वाघाटे ,आरोग्य सहायिका श्रीम.गोसावी तसेच आरगांव उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी श्रीम. परचंडेकर ,आरोग्य सेवक जाधव ,आरोग्य सेविका सावंत, आरोग्य सेवक चिले, फ्लेबोटोमिस्ट कोत्रे , आशा गटप्रवर्तक शेट्ये आशा स्वयंसेविका श्रीम. मनिषा कदम व श्रीम. सारिका गितये तसेच गावातील महिला ,किशोरवयीन मुली उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 23-09-2025














