रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे येत्या २९ सप्टेंबर रोजी श्री महालक्ष्मी पूजन व जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाचणे साळवी स्टॉप लिंक रोडवरील ब्राह्मण सभेच्या श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात हा कार्यक्रम होणार आहे.
सर्व हिंदू भाविकांनी रात्री ८ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत होणाऱ्या जागर कार्यक्रमात उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सायंकाळी होणाऱ्या देवीची पूजा , आरती व त्यानंतर होणाऱ्या भजन, आरत्यांचा व भोवत्यांचा आनंद घ्यावा, तसेच प्रसादाचा लाभ घ्यावा. ज्या नवविवाहित सुवासिनींना महालक्ष्मी वसापूजन करावयाचे आहे, त्यांनी २५ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणीकरावी. त्याकरिता सौ. अदिती राजेंद्र भावे (9423831500) किंवा रवींद्र रानडे (9423831570) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनंत आगाशे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 23-09-2025














