Khed : भोस्ते घाटाच्या पायथ्याशी टँकर-ट्रेलरचा भीषण अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथे सोमवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. भोस्ते घाटाच्या पायथ्याशी भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने पाठीमागून ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे टँकरचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आणि चालक अडकून पडला. सुदैवाने या भीषण धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकर चालक काही काळ वाहनाच्या केबिनमध्ये अडकून पडला होता.

त्याला महामार्गावरून जात असलेल्या इतर वाहनचालकांनी तत्परता दाखवत चालकाला बाहेर काढले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील वाहनधारकांनी भरधाव वेग आणि बेफिकीर वाहनचालकांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 23/Sep/2025