Mahavitaran : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज; महावितरणचे विशेष अभियान

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस दि. १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीतील सेवा पर्व पाळण्यात येणार आहे. यामध्ये महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणतर्फे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत वीज ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या या योजनेला प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे, यासाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी वीज ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी. वीज ग्राहकांना आपल्या पसंतीचा पुरवठादार निवडता येतो. महावितरणने योजनेचा लाभ घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 23/Sep/2025