रत्नागिरी : फिनोलेक्स अकॅडेमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथील एम.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी एक अभिनव कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘इंडी क्रॉप जिनियसः प्रिसिजन फार्मिंग विथ एआय इनसाइट’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले असून, त्याला भारत सरकारकडून अधिकृत कॉपीराइट नोंदणी मिळाली आहे.
हे अॅप कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना योग्य व अचूक मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने शेतकरी पीक व्यवस्थापन, मातीची काळजी, खतांचा योग्य वापर आणि हवामानावर आधारित निर्णय अधिक प्रभावीपणे घेऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हा प्रकल्प कु. तन्मय जोगळेकर, कु. वैभव बागवे आणि कु. अरमान राऊत यांनी प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. या यशाबद्दल बोलताना विद्यार्थ्यांनी सांगितले की, या कॉपीराइटमुळे त्यांच्या कामाला अधिकृत मान्यता मिळाली असून, यामुळे भविष्यात शेतकरी आणि समाजासाठी अधिक प्रभावी उपाय विकसित करण्याची प्रेरणा मिळेल. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, उपप्राचार्य डॉ. मिलिंद यादव, विभाग प्रमुख प्रा. तेजस जोशी आणि इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 23/Sep/2025














